Published On : Fri, Jun 21st, 2019

अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

कामठी: स्थानिक कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केर्डी शिवारातील जनार्धन पाटील यांच्या शेतात 15 दिवसांपूर्वीचा कुजलेल्या स्थितीत असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह आदळल्याची घटना काल दुपारी 1 दरम्यान निदर्शनास आली असून मृतकाचे अंदाजे वय 45 वर्षे असून अंगात ट्रॅक सूट सारखे वस्त्र परिधान असून पायात रबरी प्लास्टिक ची बूट आहेत. तर मृतदेह कुजलेले असल्याने ओळख पटने शक्य होत नाही यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करित मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या अनोळखी मृतदेहाचा कुजलेल्या अवस्थेत आढळले प्रकरणचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे.

– संदीप कांबळे कामठी