Published On : Fri, Jun 21st, 2019

ट्रक दुचाकी अपघातात दोन तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जख्मि

Advertisement

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील ऑरेंज सिटी लोहा कंपनी समोर कळमना हुन कामठी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक चालकाने सारख्याच दिशेने कामठी कडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक तरुण उपचारार्थ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे.ही घटना काल 20 जून ला रात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव योगेश विजय ठाकरे वय 28 वर्षे व अश्विन ढेंगे वय 25 वर्षे दोन्ही राहणार कापसी तालुका कामठी असे आहे तर जख्मि तरुणाचे नाव आदित्य काकळे वय 18 वर्षे रा धानोली ता कुही असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही मृतक व जख्मि तरुण हे मृतक योगेश ठाकरे यांच्या नातेवाईक असलेले धारगाव चे सुनील पुरुषोत्तम चांभारे यांचे कामठी येथील साबळे सेलिब्रेशन हॉल मध्ये आयोजित लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी तिन्ही मित्र संगनमताने काल 20 जून ला कापसी येथुन ट्रिपल सीट निघून कामठी च्या लग्न समारंभात सहभागी होऊन कार्यक्रम आटोपून हिरो स्प्लेण्डर दुचाकी क्र एम एच 40 बी ए 6431 ने कामठी कडे परत जात असता कळमना हुन कामठी कडे येत असलेल्या चारचाकी ट्रक क्र एम एच 40 5871 च्या चालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवीत दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेने घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार योगेश ठाकरे च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मरण पावला तर सोबत असलेल्या दोन्ही जख्मि ला नजीकच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान अश्विन ढेंगे याचा इस्पितळातच मृत्यू पावला तर जख्मि आदित्य काकळे ला नागपूर पारडी येथील माँ भवानी इस्पितळात उपचारार्थ हलविण्यात आले. तर आरोपी ट्रकचालकाने घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तसेच फिर्यादी मृतक योगेश ठाकरे चा भाऊ अमोल ठाकरे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालक विरुद्ध भादवी कलम 304(अ), 279, 338 भादवी सह कलम 184, 177 मोटर वाहन कायद्यांनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत.