Published On : Mon, Sep 23rd, 2019

बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोेडविण्यासाठी नियोजन आवश्यक – राजेंद्र मुळक

Advertisement

Rajendra Mulak

नागपूर: भाजपच्या कार्यकाळात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकास झाला असला तरी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने रोजगारभिमुख प्रकल्पांचे प्रभावी नियोजन आखणे आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आणि काॅंग्रेस पक्षाचे नागपूर ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सोमवारी ‘नागपूर टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.

वाढती बेरोजगारी ही चिंताजनक बाब आहे, मात्र त्यावर मत करायची असेल तर शासनाने शेतकरी कल्याणाच्या योजनांचा अवधी 5 ते 10 वर्षांचा न ठेवता तो 50 ते 60 वर्षांचा करावा, असे विचार मुळक मांडले. ग्रामीण भागातील उच्च शिक्षित परंतु बेरोजगार असलेल्या युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःकडे असलेली संसाधने आणि कौशल्याच्या बळावर स्वयंरोजगार निर्मिती करावी, असेही ते ‘नागपूर टूडेशी’ बोलताना म्हणाले.