Published On : Mon, Sep 23rd, 2019

राष्ट्रीय महामार्गावरीव मोकाट जनाव रांना वाचविणे काळाची गरज

Advertisement

कन्हान : – राष्ट्रीय महामार्गा वरील ऑटोमोटिव्ह चौक ते टेकाडी बस थांब्या पर्यंत चारपदरी सिमेंट रस्त्यावर मोकाट जनावरांच्या धुमाकूळाने वाहनाचा अपघात होऊन चालक, प्रवाशांना व जनावरांना गंभीर दुखापत होऊन काहीचा बळी सुध्दा जातो. यास्तव लोकासह पशुधन संवर्धन काळाची अंत्यत आवश्यकता निर्माण झाली आहे.

नागपुर, कामठी, कन्हान, कांद्री व टेकाडी येथील काही रहिवासी दुधा करिता बक-या, गाई, म्हशी या जनावरां ना पाळतात परंतु दुध न देणा-या जनाव रांचे पालनपोषण न करता मोकाट जनावरा सारखे खुले (मोकाट) सोडतात .

यामुळे मोकाट जनावरांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन महामार्गा वरील रस्त्यावर मोकाट जनावरांचे झुंडचे झुंड डेरा टाकुन बसलेली असतात तर काही इकडे तिकडे फिरताना पाहायला मिळते. संध्या पावसाचे दिवस असल्याने ही जनावरे चक्क रस्त्यावर डेरा टाकुन बसतात व इकडे तिकडे जात असल्याने वाहतुकीचा खोंळबा होऊन अपघात झाल्याने गंभीर जखमी होऊन निर्दोष लोकांना अंपगत्व किंवा दुषपरिणाम भोगावे लागते. यात कधी कधी तर मुत्युचा सामना सुध्दा करावा लागतो.

ऑटोमोटिव्ह चौक ते टेकाडी बस स्टाप पर्यंत महामार्ग चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम मंद गतीने, निष्काळजी पणाने कसे तरी सुरू असल्याने दररोज अपघात वाढतच आहे. या रस्त्यावरील विधृत व्यवस्था सुरू करण्यात न आल्या ने सुध्दा रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील जनावरे एकाएक सामोर आल्याने किंवा न दिसल्याने वाहनाची जोरदार धडक लागुन झालेल्या अपघातात वाहन चालक, प्रवाशी आणि जनावरांना गंभीर जखमा होऊन अंपगत्व किंवा जिवहानी ला बळी पडावे लागते.

ऑटोमोटिव्ह चौक ते टेकाडी बस स्टाप पर्यंत महामार्गाच्या श्रेत्रातील नागपुर महानगर पालिका, कामठी, कन्हान नगरपरिषद व कांद्री, टेकाडी (को ख) ग्राम पंचायत च्या शासन प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकास दंडात्मक कार्यवाही करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त त्वरित लावावा तसेच पावसाचे दिवस असल्या ने महामार्गावर विधृत रोशनाई करण्यात यावी. जेणे करून महामार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांंच्या वाहन अपघाताचे प्रमाण कमी होऊन निर्दोष लोकांचा बळी जाणार नाही. तसेच मोकाट जनावरांचा व्यवस्थित बंदोबस्त झाल्यास योगायोगाने पशुधन संवर्धनाचे मौलिक कार्य शासन, प्रशासनाच्या वतीने होऊन महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणावर सुध्दा आळा बसेल.