| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Oct 9th, 2018

  उमरेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

  नागपूर: नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे भरधाव जात असलेली एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले.

  जखमींमध्ये तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर – गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145