Published On : Thu, Aug 8th, 2019

उमरेड-पवणी-क-हांडला या गावांच्या जागेत अभरण्य विस्तार करण्याचे निर्देश – फुके

Advertisement

मुंबई :- उमरेड-पवणी-क-हांडला या गावांच्या जागेत अभरण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासंबंधी आज वनराज्यमंत्री परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठक घेतली.

यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर,भांडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते आणि वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी वन राज्यमंत्री म्हणाले की, उमरेड-पवणी-क-हांडला या गावांच्या भोवताली अरण्य परिसर वाढत असल्याने या परिसरात अभयारण्य वाढवून या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे.यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल.

उमरेड पवणी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ एकर हॅकटर जमिनीत करता येणार आहे.संबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने उप विभागीय अधिकारी ( एस. डी.ओ)नेमण्यात यावा.यासंबंधीत पुढील कारवाई करत असताना उमरेड-पवणी-क-हांडला या गावांमध्ये राहत असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उप विभागीय अधिकारी ( एस डी ओ) यांनी द्याव्यात.

या सुचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभरण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.