Published On : Thu, Aug 8th, 2019

‘आपली बस’ चा अधिकाधिक वापर करा!

Advertisement

आमदार सुधाकर कोहळे यांचे नागरिकांना आवाहन

नागपूर : नागपूर शहरातील खासगी वाहतूक कमी व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम बनविण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिका आणि स्थानिक नेतृत्वाच्या वतीने होत आहे. मुख्य रस्त्यांसोबतच अनेक वस्त्यांमधील लहान रस्त्यांवर असलेल्या लोकांनाही ‘आपली बस’ची सेवा मिळावी या हेतून मिनी बस आता मनपा परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या बस सेवेचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.

शहरातील जास्तीत वस्त्यांमध्ये ‘आपली बस’ची सेवा पोहोचावी व प्रवाशांना त्याचा लाभ व्हावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे ‘आपली बस’च्या ताफ्यात मिनी बस दाखल करण्यात आली आहे. मनपातर्फे बर्डी ते अमरनगर (शेषनगर) या मार्गावर मिनी बस सेवा सुरू करण्यात आली असून बुधवारी (ता.७) आमदार सुधाकर कोहळे यांनी हिरवी झेंडी दाखवून या मार्गावरील बस सेवेचा शुभारंभ केला.

याप्रसंगी हनुमाननगर झोन सभापती माधुरी प्रवीण ठाकरे, नगरसेविका मंगला शशांक खेकरे, सर्वश्री.‍ काशीनाथ नखाते, पंढरी कडु, प्रवीण ठाकरे, तुकारामजी धोबे, राजु इंगळे, शंकरराव नागमोते, शुध्दोधन लोहकरे, अभय पुनवटकर, राजु मिश्रा, नंदेश सावरकर, राजू गडेकर, प्रवीण काटले, अमोल ठाकरे, पुरुषोत्तम आखरे, अनंता गवारले, यशवंत घोडमारे, चंदू मोरे, माधवराव लोहे, दिपाली गुमगावकर, परिवहन विभागाचे सुकिर सोनटक्के, रामराव मातकर, हेमंत कावळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बस बर्डी ते अमरनगर (शेषनगर) मार्गे रेल्वेस्टेशन, बस स्टॅण्ड, तुकडोजी पुतळा, दत्तात्रयनगर, उदयनगर, भोलेबाबा नगर व विठठलनगर तसेच बर्डी ते सुमितनगर मार्गे टिळक पुतळा, आयचित मंदीर, खरबी चौक, गरीब नवाज चौक मार्गे प्रवास करेल. शुभारंभानंतर सर्व मान्यवरांनी बर्डी ते अमरनगर (शेषनगर) मार्गे रेल्वेस्टेशन या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये प्रवास केला.

विजय झलके, नागेश सहारे यांनी दाखविली बर्डी ते सुमीतनगर बसला हिरवी झेंडी
सुमीतनगर या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठीही मनपातर्फे बर्डी ते सुमीतनगर ही मिनी बससेवा सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (ता.७) जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके व आरोग्य समितीचे उपसभापती नागेश सहारे यांनी सुमीतनगर राउत नगर जवळील परिसरात हिरवी झेंडी दाखवून या बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने, ग्रामपंचायतचे सरपंच रमेश भोला कुरतुकर, उपसरपंच दिलीप चापेकर, ग्रामपंचायत सदस्य एजाज धाणीवाला, वनीता उरकुडकर, नरेंद्र नांदुरकर, इकबालभाई, याकुबभाई, श्री.नागदेवे, परिवहन विभागाचे सुकिर सोनटक्के, रामराव मातकर, हेमंत कावळे आदी उपस्थित होते.