Published On : Thu, Aug 8th, 2019

तीन बॅटरी चोरट्याना अटक, 12 हजाराचा मुद्देमाल जप्त

कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भोयर कॉलेज मार्गावरील राज रॉयल लॉज समोर उभे असलेल्या ट्रक क्र एम एच 32 एफ 5591 च्या कॅबिन मधून 12 हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना 2 ते 3 ऑगस्ट सकाळी 8 दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी हर्षल गजभिये वय 22 वर्षे रा कोळसा टाल कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

याप्रकरणात नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या दुबे डी बी पथकाने केलेल्या तपासाला आलेल्या गतीवरून अवघ्या 4 दिवसात चोरट्याचा शोध लावण्यात यशप्राप्त झाले असून तीन चोरट्याना अटक करीत त्यांच्याकडून चोरीस गेलेले 12 हजार रुपये किमतीचे दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या.

अटक तीन आरोपीमध्ये अंकुश उर्फ राम्या राजेश पाटील वय 24 वर्षे रा यशोधरा नगर कामठी, तपन उर्फ लक्की जैस्वाल वय 37 वर्षे रा यशोधरा नगर कामठी, शुभम बाबा गजभिये वय 23 वर्षे रा छत्रपती नगर कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डिसीपी निरलोत्पल, एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, गुन्हे पोलीस निरीक्षक पाल , पोलीस उपनिरीक्षक कांडेकर, डी बी स्कॉड चे ज्ञानचंद दुबे, प्रमोद वाघ, वेद प्रकाश यादव, मंगेश गिरी यांनी राबविली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे ,कामठी