Published On : Mon, Sep 14th, 2020

नोव्हेंबर अखेरपर्यत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणार बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न पध्दतीने होणार परिक्षा -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Advertisement

नागपूर – कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदयापीठांची परिक्षा प्रक्रीया नोव्हेंबर अखेरपर्यत पूर्ण करण्यात येतील. अंतिम वर्षाच्या पदवी परिक्षा बहूपर्यायी उत्तरांचे वस्तुनिष्ठ प्रश्न (एमसीक्यू) पध्दतीने होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर येथे दिली. विद्यापीठ परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात परिक्षांच्या संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश गजभिये,आमदार दुष्यंत चर्तेुवेदी ,कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी उपस्थित होते.

आज गोंडवाना विद्यापीठासोबत नागपूर विद्यापीठातही उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी परिक्षांबाबत आढावा घेतला. परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ .साबळे यांनी विदयापीठाच्या परिक्षा घेण्याच्या तयारीचे विस्तृत सादरीकरण यावेळी केले.

77 हजार 925 विदयार्थी हे अंतिम वर्षाची परिक्षा देणार असुन 1882 विषयांची परिक्षा घेण्याचे नियोजन आहे.विदयापीठाच्या परिक्षेच्या नियोजनावर श्री.सामंत यांनी समाधान व्यक्त केले .कोणताही ताण न घेता परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहनही त्यांनी विदयार्थ्याना केले.विदयार्थ्याच्या मनातील शंकाचे निरसन करण्यासाठी कुलगुरू व परिक्षा संचालकांनी फेसबुक लाईव्ह करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

ऑनलाईन एमसीक्यु पध्दतीने घेण्यात येणा-या परिक्षांमध्ये नापास झालेल्या विदयार्थ्याची जास्त वेळ न दवडता ए‍क ते दिड महीन्यात लगेच परिक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश ही त्यांनी विदयापीठ प्रशासनाला दिले. परिक्षा घेणे ,नापास विदयार्थ्याची पुन्हा 15 दिवसात परिक्षा घेणे ही सर्व प्रक्रीया नोव्हेंबर पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रशासन व विदयापीठाने समन्वयाने परिक्षा घ्याव्यात . परिक्षा घेण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मंत्री श्री .सामंत यांनी यावेळी दिली.