मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले तर महायुतीला फार कमी जागा मिळाल्या. तरीही ठाकरे गटात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी काम करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार नरेश म्हस्केंनी हा दावा केला आहे की उद्धव ठाकरेंच्या गटातले दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. मतदारसंघात कामं झाली पाहिजेत ही त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी मोदींना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
मुल्ला मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही. असं या खासदारांनी सांगितले असल्याचे म्हस्के म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात फूट पडणार का ? हे पाहावे लागेल.