मुंबई : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांना दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा,असे निर्देश दिले होते. याकरिता दुकानदारांना महिन्यांची मुदत दिली होती.ही मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. यानंतर आता मुंबई महानगर पालिकेने दुकानदारांना इशारा दिला. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही उडी घेत मस्ती असलेल्या दुकानदारांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा डाँ दिला आहे.
आमदार अजय चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याच्या विधानसभेत एकमताने मराठी पाट्यांबाबत कायदा मंजूर केला. त्यानंतर आता हा कायदा असल्याने दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या कराव्यात यासाठी मतदारसंघात फिरून आढावा घेतला.
यादरम्यान ज्यांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या त्यांचे अभिनंदन केले आणि ज्यांनी अजूनही पाट्या लावल्या नाहीत त्यांना येत्या २ दिवसांत मराठी भाषेत पाट्या करा अन्यथा मस्ती असलेल्या दुकानदारांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा ठाकरे गटाचे आमदार चौधरी यांनी दिला.