Published On : Wed, Apr 15th, 2020

यूको बैंक येथे सोशल डीस्टन्सिंग चे तीनतेरा

Advertisement

रामटेक: कोरोनाचे प्रादुर्भाव संपूर्ण जगावर कोसळले आहे. सर्वत्र लॉक डाऊन झाले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

कोरोना चा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासन तर्फे पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. दूसरीकडे यूको बैंक येथे सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा होत असुन * प्रशासकिय आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे चित्र निदर्शनास आले. ही बाब धोकादायक ठरत असल्याने नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये किवा किमान एक मीटर अंतर ठेवावे असे आवाहन आरोग्य, पोलिस , महसुल विभाग करित आहे. यूको बैंक येथे सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा होत असुन प्रशासकिय आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र निदर्शनास आले असल्याने युको बैंक प्रशासनचे ह्या गंभीर बाबीवर दुर्लक्ष का ? हे कसले सोशल डीस्टन्सिंग ? हा यक्ष प्रश्न जागरुक नागरिक करीत आहे.

ग्राहक एकापाठोपाठ उभे राहून गर्दी सोशल डीस्टन्सिंगची पायमल्ली होत आहे. बँक ने ही कोरोना बाबत काळजी घेण्यास न सांगितल्याचे दिसून आले असल्याचे चित्र जनू निदर्षनास आले ।म्हणूनच ग्राहक एकापाठोपाठ उभे होते. मधे ह्यांड वॉश ची व्यवस्था सह पिण्याचा पाण्याचा सुद्धा सोय नाही आहे.. भर उन्हात ग्राहकांना उभे राहावे लागत आहे.

देशात कोरोना चे संकट असताना बैंक प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नाही .त्यामुळे बँक प्रशासन ग्राहकांच्या जीवाशी खेळत तर नाही आहे असा प्रश्न समोर आला आहे. जीवाशी खिलवाड़ करनार्या असल्या बैंक वर कारवाई करन्याची मागनी अखिल भारतीय गाहक पंचायत चे कार्याध्यक्ष राकेश मर्जीवे यानि केली आहे.