Published On : Wed, Apr 15th, 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादन

मुंबई – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला घरातच थांबून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

आज मंत्रालयातही कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षिततेची काळजी घेऊनच हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.