Published On : Wed, Apr 15th, 2020

फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी साधणार जनतेशी संवाद

रामटेक : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान घरात असलेल्या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे स्वतः ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून उत्तरे देणार आहेत.

‘नागपूर मेट्रो रेल’ या फेसबुक पेजला कनेक्ट होऊन नागरिकांना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी बुधवार १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता संवाद साधता येईल.

नागपुरात कोव्हिड-१९ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासन काय करीत आहे, नागरिकांना कोणत्या निर्देशाचे काटेकोर पालन करायचे आहे, नागरिकांना मदत कोठून मिळेल ही माहिती जिल्हाधिकारी देतील. यादरम्यान नागरिकांना जर प्रश्न विचारायचे असेल तर संवाद कार्यक्रमादरम्यान नागपूर मेट्रो रेल या फेसबुक पेजच्या इनबॉक्स मध्ये जाऊन विचारावी. या प्रश्नांनाही ते उत्तरे देतील. नागपूरकरांनी या ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.