Published On : Thu, Nov 14th, 2019

मनसर महामार्गावरील दुर्घटनेत २ तरूण गंभीर जखमी

रामटेक :-नागपूर जबलपूर राष्र्टीय महामार्ग ७वरील आमडी येथील बंद टोल नाक्याजवळ झालेल्या सडक दुर्घटनेत २तरूण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मनसर येथील रहिवासी नरेश रतिराम चौके३२वर्ष व मंगेश दयाराम सांगोडे ३४ वर्ष हे दोन तरूण आपल्या वैयक्तिक कामानिमित्य नागपूरला मोटार सायकलने जात होते. मनसर जवळील बंद टोल नाक्याजवळ नरेश व मंगेश यांचे वाहन क्र.M H 40 0098 ला समांतर दिशेने मागून येणार्‍या MH 40 BJ 4446 या भरधाव येणार्‍या वाहनाने धडक दिल्याने दोघेही तरूण गंभीर रित्या जखमी झाले.

Advertisement

वाहन घटनास्थळावरील उपस्थित लोकांनी त्यांना मनसर येथील प्राथमिक अारोग्य केंद्रात घेवून गेले. परंतू डोक्याला जबर मार लागून दोघेही गंभीर स्थितीत असल्याने त्यांना नागपूर येथील मेडीकल ला पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.

वाहन रामटेक निवासी अवधेश तिवारी यांच्या मालकीची असून मोटार वाहन कायदा भादवी कलम 279 ,337,184 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मेजर रामेश्वर रावते यांनी दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली मनसर पोलिस चौकी येथील पोलीस कर्मचारी रामेश्वर रावते व पोलीस नायक गजानन ऊके ,बोंद्रे तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement