Published On : Thu, Nov 14th, 2019

विभागीय आंतरशालेय स्पर्धेत बीकेसीपी ची सानिका मंगर प्रथम

कन्हान : – जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व्दारे रवीनगर नागपुर येथे झालेल्या विभागीय स्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान ची खेडाळु कु सानिका मंगर ने दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत आपले स्थान निश्‍चित करित घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात विभागी य स्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धा रवीनगर नागपुर ला घेण्यात आल्या. यात १७ वयोगटात मुलीं मध्ये १०० मी. दौड (धावने) स्पर्धेत कु सानिका अनिल मंगर हीने प्रथम क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन करून सातारा येथे १६ ते १९ नोव्हेंबर २०१९ ला होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय मैदानी क्रिडा स्पर्धेत नागपु र विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

शाळेचे क्रिडाशिक्षक अमित ठाकुर यांचे मार्गदर्शनात नियमीत सराव करीत असुन राष्ट्रीय आंतरशालेय मैदानी क्रिडा स्पर्धेत कु सानिका अनिल मंगर ची निवड झाल्याबद्दल व खेडाळुने घवघवी त यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजीव खंडेलवाल, सचिव गेरोला मॅडम, मुख्याध्यापीका कविता नाथ, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर आणि सर्व शिक्षक वृंदानी, विद्यार्थ्यांनी खेळाळु सानिका मंगर चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.