Published On : Mon, Aug 19th, 2019

ट्रक ची ओला कार ला धडक दोन युवक जखमी

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चार पदरी महामार्गावरील कांद्री टोल नाक्या च्या सामोर ट्रकने ओला कार ला धडक मारल्याने कार मधील दोन युवक जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ कामठी येथे दाखल करण्यात आले आहे.

शनिवार (दि.१७)ला सकाळी ६.३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चार पदरी महामार्गावरील कांद्री टोल नाक्याच्या सामोर शिवनी वरून विहीर गाव नागपुर कडे येणा-या ओला कार क्र एम एच- एफ सी २२८९ ला अञात ट्रक च्या चालकाने आपले वाहन निष्काळजी पणे वेगाने चालवुन धडक मारल्याने कारचे नुकसान होऊन आत बसलेले शुभम पटले यांच्या डोक्याला व पिलेश वर्मा यांच्या नाकाला जखम झाल्याने त्यांना कामठी येथील खाजगी रूग्णाल यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. कन्हान पोलीसांनी संदीप हिरकणे यांच्या फिर्यादी वरून अञात ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पी एस आय शेख पुढील तपास करीत आहे.