Published On : Mon, Aug 19th, 2019

माऊथ टू माऊथ ब्रिदिंगने तिच्यात ओतला प्राण

Advertisement

रेल्वे स्थानकावरील हृदयाचा ठोका चुकविणारी घटना, श्वास मंद आणि शरीर थंड ,आरपीएफ जवानाची माणुसकी

Nagpur Railway station

नागपूर: करूणेचा झरा, संवेदनशील मन ज्यांच्या हृद्यात असतो आणि माणूस म्हणून जो जगतो अशाच लोकांच्या हातून चांगले कार्य घडतात. एखाद्या देवदूता प्रमाणेच ते मदतीला धाऊन जातात आणि जीवन मृत्यूशी संघर्ष करीत असलेल्यांना मदतीचा हात देतात. असे लोक फार क्वचितच. आज त्यांच्यातील माणुसकी आणि कर्तव्यदक्षतेमुळेच एका महिलेचा जीव वाचला. हृदयाचा ठोका चुकविणारी ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. महिलेचे नातेवाईक आणि आरपीएफ महिला कॉन्स्टेबल निता माजी यांनी माऊथ टू माऊथ ब्रिदिंग आणि हार्ट पंपींगव्दारे त्या महिलेत प्राण ओतला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महादुला, कोराडी निवासी ममता टेंभरे (४०) असे त्या भाग्यवान महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुख दु:खाचा संगम असलेल्या जीवनात कधी कोणत्या घटना घडतील हे कोणीही ठामपणे सांगु शकत नाही. आता पर्यंत सुरू असलेला श्वास दुसºयाच क्षणी थांबतो. शरीर थंड पडते, अशा अनेक घटना घडल्यात. काही जण तर अशा घटनेचे साक्षीदार आहेत. तर काहींनी साक्षात मृत्यू अनुभवला आहे. त्यातील ममता टेंभरे एक आहेत.

रक्षा बंधनानिमीत्त त्या गोंदियाला असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी गेल्या. आज १२१०६ गोंदिया – मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने नागपुरसाठी त्या निघाल्या. त्यांच्या सोबत दोन बहिणी, दोन मुले आणि अन्य नातेवाईक होते. त्या महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करीत होत्या. या गाडीत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच चढणाºयांची आणि उतरणाºयांची एकच गर्दी झाली. अशातच ममता घामाघुम झाल्या.

त्यांना श्वास घेता येत नव्हते. श्वास कमी कमी होत गेला. समोर काहीच दिसेनासे झाले. शरीरही थंड पडायला लागले. नातेवाईकांनी लगेच फलाटावर लेटविले.

दरम्यान आरपीएफच्या महिला आरक्षक निता माजी, आरक्षक ब्रिजभूषण यादव, एएसआय रामनिवास यादव, सुषमा ढोमणे आणि कामसिंग ठाकूर हे कर्तव्यावर असताना त्यांना गर्दी दिसली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गर्दी हटविली. निता माजी यांनी महिलेची स्थिती पाहुन क्षणात निर्णय घेत माऊथ टू माऊथ ब्रिदिंग दिली. तर त्यांच्या मुलांनी हार्ट पंपींग केली आणि बहिणींनी हात पायाना घासून उर्जा दिली.

दरम्यान सुषमा ढोमणे यांनी ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच बॅटरी कार चालकाला बोलाविले. महेश गिरी यांनी लगेच उपस्टेशन व्यवस्थापकांना सांगुन रेल्वे डॉक्टरची व्यवस्था केली. तिकडे बॅटर कारही पोहोचली. ममता टेंभरे यांना लगेच बॅटरी कारने फलाट एकवर आनले. दरम्यान आरपीएफ जवानांनी प्रवाशांच्या गर्दीत रस्ता मोकळा करून दिला. डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णवाहिने मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.

Advertisement
Advertisement