Published On : Tue, Aug 20th, 2019

मौदा येथील कन्हान नदीत दोन युवक बुडून म्रूत्यू

एकाचा म्रूतदेह सापडला तर दुसरा लापत्ता

कामठी : येथील कन्हान नदीच्या पात्रात दि. १९ आँगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा बुडून म्रूत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संदुराम नेहरुराम पडवाड (२६), व अमरित रामधीन निसाद (२१) दोघेही रा. कोरबादरी, ता.काटघोरा, जि. कोरबा (छत्तीसगड) असे बुडून म्रूत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार घटनेच्या दिवशी हे दोघेही कन्हान नदी वर मासे पकडण्यासाठी खोल पाण्यात गेले असता बुडून वाहून गेले. रात्री पर्यंत पोलिसांनी शोधले असता सापडले नाही.

आज दि. २० आँगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन शोध घेतले असता त्यातील एक घटना स्थळापासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर संदुराम नेहरुराम पडवाड यांचा म्रूतदेह आढळून आला. तर दुसऱ्या चा अजूनही सापडला नाही शोधमोहीम सुरू आहे. त्याचा शोध राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाव्दारे शोध घेणे सुरू आहे.

यात तहसीलदार प्रशांत सांगळे, नायब तहसीलदार दिनेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक मधूकर गीते व इतर कर्मचारी प्रत्यक्ष निगराणीत होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement