Published On : Tue, Aug 20th, 2019

खैरीच्या ‘त्या’ खून प्रकरणाचे रहस्य उलगडले, दोन आरोपीना अटक

कामठो :-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील खैरी शिवारातील हॉटेल नोव्हाटेल च्या मागील व याकूब शाह दरगाह जवळील नाल्याजवळ एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह घटनास्थळ जवळील 200 मीटर दूर अंतरावरील निर्जन जागेतील पडीत विहिरीत फेकल्याची घटना 14 जुलै ला सकाळी 9 वाजता उघडकीस आली होती मात्र यातील मृतकाची ओळख पटविणे व आरोपीचा शोध लावणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते तर महिना लोटूनही या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसाना यश प्राप्त होत नव्हते मात्र या गुन्हे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा विभाग युनिट 3 ला दिले असता अवघ्या चार दिवसात या खून प्रकरणाचे गूढ रहस्य उलगडन्यासह मृतकाचो ओळख पटवून खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची यशस्वी कामगिरी करण्यात आली असून मृतक तरुणाचे नाव शेख मातीन उर्फ मातीद वल्द जाकीर मातीन वय 30 वर्षे रा मालेगाव ता .तेल्हारा जिल्हा अकोला असे आहे तर अटक दोन आरोपी महेश उर्फ मुकेश भैय्यालाल खरे वय 29 वर्षे रा.राजीव गांधी नगर, यशोधरा नगर नागपूर, व शेख सलमान अब्दुल रहीम शेख वय 25 वर्षे रा भारत टाऊन न्यू येरखेडा कामठी असे आहे.

उल्लेखनीय आहे की खैरी मार्गावरील हॉटेल नोव्हाटेल चा सुरक्षा रक्षक हा रात्रपाळी नोकरी करून सकाळी 8 नंतर शौचविधी करण्यासाठी नजीकच्या नाल्याजवळ गेला असता एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना निदर्शनास येताच घटनेची माहिती त्वरित जुनी कामठी पोलिसांना देण्यात आली.पोलीस काही वेळेत माहिती देणाऱ्या सुरक्षा रक्षकासह घटनास्थळी पोहोचले असता मृतदेह दिसून न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते मात्र घटनास्थळी खुनाने माखलेला दगड व त्याबाजूला पडलेला रक्ताचा सडा यावर विश्वास ठेवत मृतदेह घटनास्थळाहुन हलविन्यात आल्याची शंका वळताच शोधकामात मिळालेल्या यशा नुसार मृतदेह नजीकच्या एका पडीत विहिरीत फेकून असल्याचे लक्षात येताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ नागपूर च्या शासकीय रुग्णालयात हलविन्यात आले यावेळी या मृतकाची ओळख पटू न शकल्याने तत्कालीन डीसीपी हर्ष पोद्दार यांनी शोधपत्रिका प्रसिद्धी करून ओळख पटविण्याचा प्रयत्न करन्यात आला . मात्र महिना लोटूनही मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती तसेच आरोपीचा शोध लावणे हे ही आव्हान ठरले होते.यावर हे प्रकरण 16 ऑगस्ट ला गुन्हे शाखा युनिट क्र 3 ला वर्ग केले असता अवघ्या चार दिवसात या प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात यश गाठले.

यानुसार सदर आरोपीमधील महेश खरे यांनी मृतक शेख मतीन कडून काही महिन्यांपूर्वी दोन हजार रुपये उधार घेतले होते.हे पैसे परत मागण्यासाठी मृतक हा नेहमी आरोपी महेश सोबत नेहमी वाद घालून शिवीगाळ देऊन अपमानित करायचा या अपमान व नेहमीच्या मारहानिचा सूड घेण्याच्या उद्देशाने सदर आरोपीने योजनाबद्ध पद्ध्तीने मित्र ।शेख रहमान तसेच मृतक शेख मतीन ला ऑटो क्र एम एच 49 ए आर 7108 मध्ये सोबत घेऊन सदर घटनास्थळी नेऊन त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचून खून करीत जीवानिशी ठार करून मृतदेह याकूब शहा दरगाह च्या बाजूला असलेल्या नाल्याच्या कडेला फेकून 13 जुलै च्या रात्री साडे अकरा दरम्यान पसार झाले मात्र या खून प्रकरणाचे बिंग न फुटावे व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने दुसऱ्याच दिवंशी 14 जुलै ला ‘तो ‘मृतदेह नजीकच्या निर्जन स्थळाच्या पडीत विहिरीत फेकुन पसार झाले होते.

या प्रकरणाचा गुन्हे शाखा विभागाने केलेल्या तपासनि नुसार मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे बजाज मगमीना चा एक ऑटो पुसट नंबर चा जाताना दिसला या ऑटो ची विचारपूस करून व गुप्त बातमीदार लावून पाटणी ऑटोमोबाईल तसेच खेमका ऑटोमोबाईल च्या ऑटो असलेल्या 749 ऑटो चालकांची 15 पोलिसांचे एक पथक तयार करून एक पथक 50 ऑटो चालकांची विचारपूस करणार या बेताने काम सुरू असता यातील एम एच 49 ए आर 7108 चा ऑटोचालक या खुन प्रकरणात उडवाउडवीची उत्तरे देऊन समाधान कारक उत्तर न दिल्याने याला पोलीस हिसका दाखवताच खून केल्याची कबुली दिली व 2000 रूपयाची उधारी वरून नेहमीचा होत असलेला अपमान व मारहाणीला कंटाळून योजनाबद्ध पद्धतीने खून केल्याची कबुली दिली.यानुसार सदर दोन्ही आरोपीला भादवी कलम 302, 201, 34 अनव्ये अटक करण्यात आली.

ही यशस्वी कारवाही पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांच्या निदर्शनार्थ अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनार्थ गुन्हे शाखा युनिट क्र 3 चे वरिष्ठ पोलीस निरक्षक नरेंद्र हिवरे, सपोनो पंकज धाडगे, योगेश चौधरी, राजेंद्र बघेल, रफिक खान, शत्रूघन कडू , अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण, अतुल दवंडे, श्याम कडू, प्रवीण गोरटे, राकेश यादव, टप्पूलाल चुटे, परवेज शेख, संदीप मावलकर, सुरज भोंगाडे, सुहास शिंगणे, राजू पोतदार, शेख फिरोज, शेख शरीफ, सुरेंद्र यादव आदींनी केली .
संदीप कांबळे कामठी