नागपूर : प्रतापनगर परिसरात मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी उभ्या असलेल्या दोन वाहनांना आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत दोन्ही वाहनांचे केबिन पूर्णपणे जळून खाक झाले असून वाहनमालकाचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ही घटना श्यामनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. तक्रारदार ६७ वर्षीय जमाल यासीन पठाण हे गेल्या १५ वर्षांपासून मजुरांना काँक्रीट फोडण्याची तसेच लोखंड कापण्याची यंत्रसामग्री भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. रोजच्या प्रमाणे त्यांनी आपली मारुती ओम्नी आणि टाटा एस ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
मात्र, मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने दोन्ही वाहनांच्या केबिनला आग लावली. काही वेळातच आग भडकली आणि दोन्ही वाहनांचे केबिन पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत वाहनमालकाचे सुमारे अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, वाहनांना आग लावण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वैमनस्य, जाणीवपूर्वक केलेली जाळपोळ किंवा इतर कोणता हेतू होता, याचा सर्व अंगांनी तपास प्रतापनगर पोलीस करत आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





