Published On : Fri, Mar 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नकली चलन प्रकरणात दोघांना ७ वर्षांची शिक्षा; न्यायालयाचा कठोर निर्णय

Advertisement

नागपूर : नकली चलन प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १६ श्री. नितीन जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

या प्रकरणात जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख या आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या कलम १८० (३/५) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

६ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथक गस्त घालत असताना मेयो हॉस्पिटल परिसरात दोन संशयितांकडे नकली नोटा असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या जवळून ५०० रुपयांच्या एकूण २४३ नकली नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटा खऱ्या चलनासारख्या दिसत असल्या तरी अनेक नोटांवर एकच क्रमांक असल्याचे उघड झाले.

Gold Rate
Mar 25,2026 - Time 11.05Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,700 /-
Silver/Kg ₹ 2,37,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जप्त केलेल्या नोटांची पडताळणी नाशिक येथील चलनी मुद्रणालयात करण्यात आली. अहवालात सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तपास पूर्ण करून पोलीस निरीक्षक रसूल शेख यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच जप्ती पंचनामा आणि मुद्रणालयाचा अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले. सहाय्यक सरकारी वकील अँड. अभय जिकार यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींविरुद्ध मजबूत बाजू मांडली.

सर्व पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे नकली चलन व्यवहारांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement