Published On : Sat, Apr 11th, 2020

नागपुरात दोन  कोरोनाचे रुग्ण वाढले

नागपुर: राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Corona Positive Patient) आहे. आज (11 मार्च) राज्यात 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे.

पुण्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या दाम्पत्याला (Maharashtra Corona Positive Patient) कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर दुसरीकडे पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात तीन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तर औरंगाबादमध्ये आणखी दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेमधील कोरोना रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे.


राज्यात कुठे किती रुग्णांची वाढ?

औरंगाबाद – 2
ठाणे – 3
कोल्हापूर – 1
पुणे – 3
नागपूर – 2

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पोलिसाची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण लॉकडाऊनदरम्यान साताऱ्यात एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. याठिकाणी ते सर्व पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. तर एका रुग्णालयात काम करणाऱ्या आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांना बदलापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढले

तर कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापुरात आज (11 एप्रिल) महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

त्याशिवाय नागपुरात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील एक रुग्ण हा सतरंजीपुरा भागातील मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर दुसरा रुग्ण हा चंद्रपूर येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 वर गेला (Maharashtra Corona Positive Patient) आहे.