Published On : Tue, Oct 22nd, 2019

कामठी विधानसभा मतदार संघात मागील दोन तासात 7 टक्के मतदान

कामठी : आज 21 ऑक्टोबर ला कामठी विधानसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर एकूण 4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मागील दोन तासातील सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संघ मानल्या जाणाऱ्या कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर 4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत ज्यामध्ये 2 लक्ष 25 हजार 691 पुरुष मतदार तर 2 लक्ष 14 हजार 181 स्त्री मतदार आहेत तसेच तीन तृतीयपंथी मतदार चा समावेश आहे.

Advertisement

निवडणूक प्रशासन च्या वतीने मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कामठी विधानसभा मतदार संघाअंतर्गत 494 मतदान केंद्र आरक्षित करण्यात आले असून यामध्ये कामठी शहरात 245 मतदान केंद्र, मौद्यात 105, नागपूर ग्रामीण मध्ये 130 मतदान केंद्र असे एकूण 480 मतदान केंद्र आहेत तसेच 14 सहाययक मतदान केंद्र आहेत ज्यामध्ये कामठी 3, मौदा 1 व नागपूर ग्रामीण च्या 10 मतदान केंद्राचा समावेश आहे.याशिवाय 593 बॅलेट युनिट, 643 कंट्रोल युनिट व 27 वि हिपॅट आहेत .मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर 543 केंद्राध्यक्ष सह प्रत्येकी 3 मतदान केंद्र अधिकारी ची नियुक्ती करण्यात आली आहे.या प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे तर 48 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात आले आहे यामुळे या मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण होणार आहे.दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या मतदार संघात नागपूर ग्रामीण चे सेंट पॉल हे मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र तर 132 सखी मतदान केंद्र आहेत.

कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत त्यात 7 पक्षीय तर 5 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे या कामठी विधानसभा मतदार संघात कामठी तालुका, मौदा तालुका तसेच नागपूर ग्रामीण चा समावेश आहे यामध्ये एकूण 4 लक्ष 39 हजार 875 मतदारांचा समावेश असून कामठी तालुक्यात 2 लक्ष 27 हजार 333 मतदारांचा समावेश आहे ज्यामध्ये 1 लक्ष 16 हजार 584 पुरुष मतदार, तर 1 लक्ष 10 हजार 746 स्त्री मतदारांचा समावेश आहे, मौदा तालुक्यात 79 हजार 944 मतदार आहेत ज्यामध्ये 40 हजार 570 पुरुष तर 39 हजार 374 स्त्री मतदारांचा समावेश आहे तसेच नागपूर ग्रामीण मध्ये 1 लक्ष 32 हजार 598 मतदारांचा समावेश आहे ज्यामध्ये 68 हजार 537 पुरुष तर 64 हजार 61 स्त्री मतदारांचा समावेश आहे.तेव्हा लोकशाहीच्या बळकटी करणासाठी आज 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58 -कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी एसडीओ श्याम मदनूरकर, सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे, तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement