Published On : Tue, Oct 22nd, 2019

रामटेक येथे उत्साहपूर्ण व शांततामय वातावरणात मतदान पार पडले

रामटेक : विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणूकित रामटेक शहरात व तालुक्यातही अत्यन्त शांततामय वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासून अगदी संथपणे येणारा मतदाता दहा नंतर लगबगीने मतदानासाठी येऊ लागला.विशेष लक्षणीय बाब ही की,सकाळपासूनच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ,महिलांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. घरची प्रौढ बायामानसे व तरुण मुले-मुली म्हाताऱ्यांना सोबत मतदानासाठी घेऊन येत होते.रामटेक येथील बरेच तरुण-तरुणी उच्च ,वैद्यकीय, परामेडिकल ,बिझनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी शिक्षणासाठी विशेषतः पुणे व नागपूर येथे शिकत असून वेगवेगळ्या ठिकानच्या शहरात शिकणारी तरुण-तरुणी दिवाळीच्या सुत्यात घरी आली असून त्यांनी मतदानाचा हक्क यावेळी आनंदाने बजावला.

नोकरीसाठी बरीच तरुण व प्रौढ मंडळी शहरात वास्तव्यास असून दिवाळीच्या सणासुदीला ते घरी आले असून बऱ्याच वर्षांनी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला . सर्वात जास्त उत्साहाने नावमतदारांनी मतदान केले. सकाळी सात पासून तर पाच पर्यंत नवमतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर दिसून आले.मतदानाच्या दिवशी आठवीची पूजा असल्यामुळे आणि दिवाळीच्या व्यापाराला सुरुवात झाल्यामुळे किरकोळ ,चिल्लर दुकानदार ,व्यापारी व महिलांनी सकाळीच मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.विवाहित मुली दिवाळीच्या सणाला माहेरी येतात परंतु यावेळी मतदान करण्यासाठी बऱ्याच विवाहित मुलींनी माहेरी येऊन मतदानाचा हक्क बजावला.

Advertisement

दुपारी दोन पासून बहुतांश मतदान केंद्रावर मोठया प्रमाणावर मतदारांनी गर्दी केली होती आणि ती मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कुशल प्रशासनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि सर्व अधिकारी ,कर्मचारी व पोलीस दल, कमांडो यांच्या कुशल कार्यप्रणालीतुन निवडणूक शांततामय वातावरनात पार पडलेली असून मतपेटीत नऊ उमेदवारांचे भाग्य बंद झाले असून एकूण रामटेक मतदारसंघात 62 टक्केच्या वर

Advertisement

मतदान होण्याची शक्यता असून चुरशीच्या लढतीत कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement