Published On : Tue, Jun 4th, 2019

चोरीच्या गुन्ह्यातील दोन चोरट्याना अटक, 45 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी: स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक येथील विवेक यादव यांच्या बंद देशी दारू च्या दुकानातील टीनाच्या छतावरून दुकानातून अवैधरित्या प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे व गल्ल्यातील नगदी पैसे चोरून नेल्याची घटना 17 मे ला रात्री अकरा दरम्यान घडली असता फिर्यादी विवेक यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवून तपासात घेतला असता तपासाला दिलेल्या गतीतून जुनी कामठी पोलिसाना यशप्राप्त होत यातील मुख्य चोरट्यासह सह आरोपीला सुद्धा अटक करीत यांच्याकडून गुन्हा कबुल केलेल्या तीन चोरी प्रकरणातील 1 सीसीटीव्ही कॅमेरा किमती 800 रुपये , नगदी 1700 रुपये तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील नगदी 2700 रुपये तसेच हिरो होंडा करिझमा क्र एम एच 40 ए ए 5329 किमती 40 हजार रुपये असा एकूण 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक दोन चोरट्या आरोपीमध्ये सचिन उर्फ वांग्या राकेश कुमरे वय 21 वर्षे रा दुर्गा चौक कामठी, अयुब खान वल्द युसूफ खान वय 49 वर्षे रा दुर्गा चौक कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार , एसीपी राजेश परदेसी, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनार्थ डीबी पथकाचे किशोर गांजरे, विजय सिन्हा, रोशन पाटील, पावन गजभिये आदींनी पार पाडली

– संदीप कांबळे कामठी