Published On : Tue, Jun 4th, 2019

कामठी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

कामठी: ऑल इंडिया जमाईतूल कुरेश समाजाचे वतीने भाजी मंडी परिसरातील चौधरी मज्जिद येथे पवित्र रमजान महिन्याच्या पर्वावर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

पवित्र रमजान महिन्याच्या परवा वर चौधरी मज्जिद भाजी मंडी येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून सामूहिक रोजा सोडण्यात आला , इफ्तार पार्टीचे पर्वावर मुस्लिम बांधवांना अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य व माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे ,नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर ,कामठी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हाजी शकुर नागणी, कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधारे जुनी कामठीचे ठाणेदार किशोर नगराळे ,दुय्यम निरीक्षक देविदास कठाळे, नवीन कामठीचे दुय्यम निरीक्षक राधेश्याम पाल, किशोरी बाबा ,अनुराग भोयर , इरसाद कुरेशी, असफाक कुरेशी, इरसाद शेख मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते

– संदिप कांबळे कामठी