कन्हान ; – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावरीस खेडी (खोपडी) शिवारात दोन आरोपीनी फिर्यादी व त्च्याच्या लहान भावाला व मोठ्या भावा च्या पत्नी ला लाकडी दंड्याने पायावर व हातावर मार हाण करून जख्मी केल्याने तक्रार केल्याने कन्हान पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार उमेश पुडंलिक वैद्य वय ५३ वर्ष राह. खेडी (खोपडी) यांची खेडी शिवारात ३ एकर शेती असुन त्या शेती मध्ये तीन भाऊ व दोन बहीणी असे हिस्से आहे. शेती उमेश वैद्य सह सर्व मिळुन करि त असुन त्यांच्या शेताच्या बाजुला १) संतोष ज्ञानेश्वर काळे, २) मंगेश ज्ञानेश्वर काळे यांची शेती लागुन आहे.
या शेती बाबद कोर्टात केस सुरू आहे. पण शेतीचे ७/ १२ वर उमेश वैद्य यांचे सह पाचही भाऊ बहिणेचे नावावर असुन ते शेती करतात. मंगळवार (दि.२६) जुलै ला दुपारी १२:४५ वाजता दरम्यान उमेश वैद्य सह सर्व मिळुन शेतीचे काम करण्याकरिता आपल्या शेता त गेले असता
१) संतोष काळे,
२) मंगेश काळे दोन्ही राहणार खेडी (खोपडी) यांनी उमेश वैद्य व त्याच्या लहान भाऊ नामदेव आणि मोठ्या भावाची पत्नी नामे आशा दिलीप वैद्य यांना लाकडी दंड्याने पायावर व हातावर मारहाण करून जख्मी केले.
व शिवीगाळ करित पुन्हा या शेतावर काम करित दिसल्यास सर्वांना जिवाने मारून टाकु अशी धमकी दिली. उमेश वैद्य यांना व त्यांच्या बहीण भावाला दोन्ही आरोपी पासुन जिवितास धोका असल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी उमेश वैद्य यांच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी
१) संतोष ज्ञानेश्वर काळे,
२) मंगेश ज्ञानेश्वर काळे यांच्या विरुद्ध अप क्र. ४४३/२२ कलम ३२४, ५०६ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन कन्हान पोलीस स्टेश नचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शना त कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.