Published On : Sat, Jul 30th, 2022

पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता शहरातच कायम बनविण्यात यावी

Advertisement

– दुकानदार महासंघाचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेख र बावनकुळे, पोलीस अधिक्षकाना निवेदन- पोलीस स्टेशन बाहेर स्थलांतरीत न करता शह रातच नवीन इमारत एका वर्षात पुर्ण करा. बावन कुळे चे पोलीस अधिक्षकाना आदेश.

कन्हान : – शहरातील गांधी चौक येथे मागील ४० वर्षापासुन भाड्याने कन्हान पोलीस स्टेशनचे असुन शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन चोरी, घरफोडी, अवैध कोळसा, रेती, दारू, नशिले पदार्थ, जुआ, सट्टा मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरू असु न शांती सुव्यवस्था बाधित होत सर्वसामान्य नागरिकां ना त्रास सहन करावा लागत असुन सुद्धा पोलीस स्टेश न स्थलांतरीत होणाच्या चर्चेला उधाण आल्याने कन्हा न-कांद्री दुकानदार महासंघ दुकानदार बांधवांच्या शिष्ट मंडळाने माजी ऊर्जामंत्री, विधान परिषद सदस्य मा. चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर व संबंधित अधिका-यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन कन्हान पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता पुर्वरत कायम स्वरूपी शहरातच नविन इमारत बनविण्याची मागणी करण्यात आली आहे.

कन्हान-पिपरी शहर हे पारशिवनी तालुक्यातील सर्वात मोठी नांगरी लोकसंख्येची नगरपरिषद शहर म्हणुन ओळखल्या जात आहे. एकेकाळी महाराष्ट्रात क्रमाक २ ची ग्राम पंचायत असुन औद्योगिक क्षेत्र म्हणुन प्रसिद्ध होते. सध्या नावारूपास असुन सर्व उद्योगधंदे बंद पडुन ओसाड झाल्याने मोठया प्रमाणात बेरोजगारीच्या थैमानाने युवक, नागरिक नशेच्या आहा री जावुन कौटुंबिक वातावरण दुषित होत आहे. कन्हा न पोलीस स्टेशन अंतर्गत ३० गावे असुन कन्हान नगर परिषद सह तालुक्यातील कांद्री व टेकाडी मोठया ग्राम पंचायत लगत आजुबाजुच्या ग्रामिण भाग व शहरी भाग हा संपुर्ण परिसर कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने तसेच या ३० गावाचे केंद्र, मुख्य बाजार पेठ असल्याने खरेदी-विक्री, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय कन्हान शहरात म्हणजेच नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर स्थापित आहे.

यामुळे असंख्य नांगरीकांची दररोज वर्दळ, गर्दी असुन मोठ्या प्रमाणात लोकांची रेलचेल असते. नांगरीकांच्या सुरक्षे च्या दृष्टी कोणातून ३५ ते ४० वर्षापासुन गांधी चौकात पोलीस स्टेशन भाड्याच्या इमारतीत कार्यरत असल्या ने काळानुरूप सुविधेच्या कमतरतेमुळे पोलीस प्रशास नाला अडचणी सामना करावा लागत पाहीजे तसा वचक ठेवण्यास पोलीसाना बाधा निर्माण होऊन उप द्रवी, गुंडागर्दी, समाजकंटक, असामाजिक तत्वाला वाव मिळुन कन्हान पोलीस स्टेशन व्दारे नागरिकांना पाहीजे तशी सेवा, सुरक्षता पुर्णपणे देऊन समाधान करू शकत नसल्याने मागील काही महिन्यांपासून शह रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत शांती सुव्यवस्था बाधित होत असताना धोक्यात आल्यावर ही कन्हान शहरा गांधी चौक येथील पोलीस स्टेशन कार्यालय शहरा बाहेर स्थलांतरीत करण्यात येईल अश्या नांगरि कांच्या चर्चेला उधाण आले आहे.

नागपुर शहरातील गन्हेगारी व गुन्हेगारावर जबरदस्त अकुंश असल्याने शहरातील गुन्हेगार ग्रामिण भागात सक्रिय झाले अस ताना कन्हान शहराबाहेर पोलीस स्टेशन स्थलांतरीत झाले तर हया उपद्रवी, गुंडागर्दी, समाजकटंक, असा माजिक तत्व, डकैती, अवैध धंधे, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नसुन जिवीतहाणी, शाररीक, मानसिक त्रासाच्या ज्वलंत समस्येचा सर्वसामान्य नागरीकांना भयंकर त्रासात वाढ होईल. सदर विषयाचे जाणिवपुर्वक गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून कन्हान शहर, ग्रामिण नागरीकाची सुरक्षा सोयीसुविधा करीता नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील गांधी चौक कन्हान चे पोलीस स्टेशन कार्यालय स्थलांनतर न करता पुर्वरत शहरातच ठेवत नविन इमारतीत कायमस्वरूपी करण्यात यावे. अशी मागणी कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत मसार, सदस्य ऋृषभ बावनकर सह दुकानदार बांधवांनी माजी ऊर्जामंत्री, विधान परिषद सदस्य मा. चंद्रशेखर बावनकुळे व पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर व संबंधित अधिका-यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन मागणी केली. आणि निवेदनाच्या प्रतिलीपी राज्याचे मुख्यमंत्री, उपमु ख्यमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा अध्यक्षा जि प नागपुर, जिल्हाधिकारी नागपुर सह संबंधित विभागाला देण्यात पाठविण्यात आल्या आहे.

पोलीस स्टेशन शहरातच कायम ठेवत एका वर्षात नवीन इमारत बांधकाम पुर्ण करा – मा.बावनकुळे
कन्हान कांद्री दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत मसार व सदस्य ऋषभ बावनकर सह दुकानदा राच्या विषयाचे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत करून विधान परिषद सदस्य व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर यांना फोनवर चर्चा करित कन्हान पोलिस स्टेशन शहराबाहेर स्थलांतरीत न करता पुर्वरत शहरात च उपलब्ध जागेत कन्हान पोलीस स्टेशनच्या नविन इमारतीचे बांधकाम करण्यांत यावे. तसेच पोलीस स्टे शन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत गांधी चौक येथे पो लीस स्टेशन कायम ठेवत एका वर्षात नवीन इमारत बांधकाम पुर्ण करण्याचे आदेश दिल्याने कन्हान-कांद्री दुकानदार बांधवांनी मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरैशी, सचिन गजभिये, प्रदीप गायकवाड , डॉ मुंधडा, चंद्रशेखर पडोळे, गंगाध र ढोमणे सह दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.