| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Oct 25th, 2018

  १ लाख १५ हजार लुटणारे दोन आरोपींना अटक

  आरोपीचा २९ ऑक्टोबर पर्यंत पी सी आ

  कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्ग क्र ४४ वरील कन्हान शहरातील कपुर गोडाऊन येथील सी तिवारी गँस एजन्सी चे सिंलेडर वाटप के़द्रात दोन्ही महिलेला चाकुचा धाक दाखवुन १२७ सिंलेडर चे नगदी १ लाख १४ हजार ९९८ रूपये लुटणारे दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता २९ ऑक्टोबर पर्यंत पी सी आर मिळाला आहे .

  मंगळवार (दि.२३) ला दुपारी दिड ते दोन वाजता दरम्यान नागपुर जबलपुर महामार्ग क्र ४४ लागुनच असलेल्या कन्हान शहरातील कपुर गोडाऊन येथे सी तिवारी गँस एजन्सी च्या सिलेंडर वाटप केंद्रात दोन आरोपी तोंडावर पिवळा व पांढरा स्कार्प बांधुन कार्यालयात घुसले व कंचन तिवारी व कोमल बोरकर यांच्या मानेवर चाकु लावुन त्यांना जिवे मारण्याचा धाक दाखवुन त्यांच्या जवळील १२७ सिंलेडरचे नगदी १ लाख १४ हजार ९९८ रूपये लुुटमार करण्याच्या प्रकरणाचे आरोपी स्वप्निल गणेश कुसरे वय १९ वर्ष मु धरमनगर कन्हान व राकेश गणेश मेश्राम वय २२ वर्ष मु पिपरी हयाना कन्हान पोलीसांनी बुधवार (दि.२४) ला रात्री उशिरा अटक करून गुरुवार ला कामठी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशाने २९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अन्य आरोपी, साहित्य व सखोल विचारपुस करण्याकरिता पी सी आर देण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रल्हाद धवड करित आहे .

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145