Published On : Thu, Oct 25th, 2018

कन्हान नगरपरिषद येथे आधार कार्ड व सुविधा केंन्द्र सुरू करण्यात यावे

Advertisement

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरीचे मुख्याधिकारी गांवडे यांना कन्हान शहर विकास मंच व्दारे निवेदन देऊन नगरपरिषद येथे आधार कार्ड व सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली .

कन्हान शहरात आधार कार्ड बनविण्याची व दुरूस्ती करण्याची समस्या दिवसेदिवस वाढत आहे . शहरातील आधार कार्ड केंन्द्र बंद असल्याने नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे . छोटय़ा मोठय़ा कामाकरिता पारशिवनी तहसिलदार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे .

आघार कार्ड करिता पारशिवनी , कामठी गेले असता तिथे लांब रांगा असल्याने परत यावे लागते . या सर्वसामान्य जनतेच्या न्याया करिता कन्हान शहर विकास मंच ने नगर परिषद कन्हान – पिपरीचे मुख्याधिकारी सतीश गावंडे हयाना शिष्टमंडळ भेटुन आधार कार्ड व सुविधा केंन्द्र सुरू करण्याची मागणी केली आहे . शिष्टमंडळात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष रूषभ बावनकर, उपाध्यक्ष माधव वैद्य, प्रकाश कुर्वे, शाहरूख खान, सचिन यादव, मुकेश गंगराज, दिनेश भालेकर, सुनिल हटीले, चंदन मेश्राम, अक्षय फुले, हरीओम, आदी प्रामुख्याने उपस्थित होते .