Published On : Thu, Oct 25th, 2018

महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना

मदत करण्याबाबत नागपूर येथील रेशीमबाग परिसर येथील जैन कलार सभागृहात ‘महापरीक्षा’ पोर्टल विरोधात मार्गदर्शक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.अनिलजी अहिरकर यांच्या नेतृत्त्वात हजारो विद्यार्थ्यांनी रेशीमबाग चौक ते सक्करदरा चौक मोर्चा काढून आंदोलन केले. ‘महापरीक्षा’ पोर्टलची पद्धत भ्रष्ट आणि कुचकामी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.पोर्टल ऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच परीक्षा घ्याव्यात,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक स्वरुपात पदवी प्रमाणपत्र जाळून रोष व्यक्त केला . तसेच सभागृहामध्ये पाच विद्यार्थ्यांनी मुंडन करुन आपला रोष व्यक्त केला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही महिन्यांपासून सरकारने महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून विविध विभागांमधील नोकर भरती ऑनलाईन परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या संगणक केंद्रांवर महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा आयोजित केली जाते. मात्र, अशा परीक्षा केंद्रांवर संगणक जुनाट आणि कुचकामी असतात, ते वेळेवर चालत नाही, बंद पडतात असा आरोप नागपुरातील आंदोलक स्पर्धक विद्यार्थ्यांचा आहे . मा.अनिलजी अहिरकर यांना हा प्रश्न खूप गंभीर वाटला .

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्र्यांच्या शहरात झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आम्ही रेटून धरु.. आणी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी धनंजय मुंडे साहेब यांच्या मदतीने विधानपरिषदे मध्ये प्रश्न मांडण्याची ग्वाही मा.अनिलजी अहिरकर रा.का.पा. नागपूर शहराध्यक्ष यांनी दिलेली आहे .आंदोलन यशस्वी करण्यासाठी अँटी महापरीक्षा पोर्टल समिती नागपूर चे प्रशांत काकडे,विनायक तडस संजय रणदिवे यांनी खूप परिश्रम घेतले.

अनेक प्रकारे महापरीक्षा पोर्टल च्या चुका घडलेले असून सुद्धा सरकार दुर्लक्ष करीत आहे.सदर प्रकरणी लक्ष्य देऊन लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात मदत करावी ही विनंती .

Advertisement
Advertisement