Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 18th, 2020

  बारावीच्या परीक्षेला सुरुवात रामटेक कस्टडी अंतर्गत ११ परीक्षा केंद्र

  एकूण २४२६ विद्यार्थी-विद्यार्थीनी परीक्षेला बसले

  रामटेक: शालेय शिक्षणाचा अतिशय महत्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून रामटेक कास्टडीतील ११परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या पेपरने सुरुवात झाली. या परीक्षा केंद्रावर एकूण २४२६ विद्यार्थी-विद्यार्थीनी परीक्षेला बसलेले आहेत.सकाळी साडेनऊ पासूनच परीक्षा केंद्रावर पालक मंडळी व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गर्दी केली होती.

  आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण टप्प्यावरील परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थी व पालकमंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रोल नंबर्स बघण्याकरिता सहकार्य केले .

  रामटेक कस्टडी अंतर्गत सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी परीक्षा विभागाचे परीरक्षक व गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने, सहाय्यक परीरक्षक प्रभाकर ठाकरे कार्यरत आहेत.पहिल्या पेपरची सुरुवात शांततेत पार पडली असून कुठेही गैरप्रकार झाला नसल्याची महिती गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांनी दिली .


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145