Published On : Tue, Feb 18th, 2020

शौचालय सफाईचा प्रश्न येरणीवर.

Advertisement

कन्हान : येथील नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवक आपला कार्यकाल सांभाळणार आहे. मागील पाच वर्षात प्रत्येक घरी शौचालय बनविलण्यात आले, व निवडणुकी दर्मियान शौचालय असल्याचे प्रमाणपत्र देखील उमेदवारांना घ्यावे लागले. मात्र शौचालयातील घाण सफाई साठी अजून देखील नगरपरिषदने कुठलीही उपाय योजना केली नाही ज्या मुडे नागरिकांना गडर सफाईचे दाम दुप्पट रक्कम मोजावी लागत आहे. तर उपाययोजना नसल्याने प्रायव्हेट गडर सफाई धारक ही घाण नाल्यात व नदीत टाकत असून हे कृत्य नागरिकांनी स्वता अनेकदा बघितले आहे व याची तक्रार देखील पोलीस स्टेशन मध्ये केली आहे. तरी यावर कारवाई व उपाययोजना करून आडा घालण्याची भूमिका अजूनतरी कुणीही घेतलेली नाही.

नगरपरिषदने लाखो रुपये खर्च करून गडर टँक सफाई मशीन घेतली होती, अनेकांनी आपल्या घरचे गडर टँक भरल्यावर ते खाली करण्यासाठी नगरपरिषदेत अर्ज केले मात्र तांत्रिक खराबी असल्याचे सांगून नागरिकांना प्रायव्हेट गडर सफाई वाल्याकडे दिशा दाखविण्यात येते, ही स्तिथी गेल्या पाच वर्षान पासून सुरू असून नवीन गडर मशीनचा वापर मात्र दोन दर्जन च्या आत (२२) नागरिकांनी घेतला आहे, नगरपरिषद मार्फत १२०० रुपये प्रत्येक ट्रिप गडर सफाई चे लागतात, व या मशीना भंगारात पडल्याने नागरिकांना प्रायव्हेट मशीनाचे प्रत्येक ट्रिप मागे ३००० रुपये मोजावे लागत आहे.

Advertisement
Advertisement

उपाय नसल्याने नागरिकांशी चालाखी व फसवणूक करून एका गडर सफाईचा तीन ट्रिप नुसार ९ हजार रुपयांचा फटका बसत आहे. प्रथम वेळी गडर खाली झाल्यानंतर ती काही वर्षातच पुन्हा भरत असून या मुडे प्रायव्हेट मशीन धारकांचे अच्छे दिन आले आहे. ज्या मुडे नगरपरिषदचे मुख्यधिकारी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सतरा नगरसेवकांनी या गंबिर बाबीकडे विशेष ध्यान केंद्रित करून दोन गडर सफाई मशीन चालत्या अवस्थेत उपलब्ध करून देण्याची मांगणी नागरीक करीत आहे.

आरोग्य सभापती, पालकमंत्रीने लक्ष द्यावे
नागपूर जिल्यातील अनेक ग्रामपंचायत, नगरपंचायत किव्वा नगरपरिषद असो स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून शौचालयाच्या नावा खाली कोट्या वधील रुपये खर्च केले गेले मात्र कुठेही शौचालय सफाईची व्यवस्था नसल्याने अखेर नदी नाल्यातच ही घाण गुपचूप टाकण्यात येते ज्यामुडे गाव हागणदारी मुक्त जरी झाले तरी, नदी नाले हागणदारीच्या थेट संपर्कात येत आहे. ग्रामीण भागात या पाण्याचा वापर अंगोड, कपडे, भांडे धुतांना आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते, इतकी गंभीर समस्या असून सुद्धा आरोग्य विभागाने याकडे पाट फिरविली आहे. समोरील प्रगतीच्या ड्रीष्टीकोनातुन जिल्ह्यातील आरोग्य सभापती, पालकमंत्रीने सुरू असलेल्या गोंधळ कारभारावर विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement