Published On : Sat, Mar 7th, 2020

तुलसीदास भाणारकर आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

Advertisement

भाणारकर यांना सन्मानाचा दुहेरी मुकुट प्राप्त २०१४-१५ व २०१८-१९ असे दोन पुरस्कार प्राप्त

नागपूर:- तालुक्यातील ब्राम्हणी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक तुलसीदास भाणारकर यांना त्यांच्या ग्रामपंचायत अंतर्गत अतिउत्कृष्ट ग्रामविकासात्मक कामे केल्यामुळे त्यांना नागपूर जिल्हा परिषदेकडून सण २०१८-१९ चा जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला.

गत पाच वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण दि ५ मार्च ला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली वनामती सभागृह येथे करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी प चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव,कृषी सभापती तापेश्वर वैद्य,विभागीय उपयुक्त अंकुश केदार,जी प चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,नागपूर पंचायत समितीचे उपसभापती संजय चिकटे,जी प सदस्या वृन्दा नागपुरे आदी उपस्थित होते.

ग्रामसेवक तुलसीदास भाणारकर यांचेकडे ब्राम्हणी व्यतिरिक्त आलागोंदी ग्रामपंचायत चा सुद्धा कार्यभार असून गत पाच वर्षांपासून ते दोन्ही ग्रामपंचायत मध्ये समतोल राखून उत्कृष्ठ काम करीत आहे.त्यामुळे त्यांना यावेळी सण २०१४-१५ चा आलागोंदी ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट विकासाची कामे केल्यामुळे सुद्धा जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला.भाणारकर हे दोनदा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार पटकविणारे जिल्ह्यात एकमात्र ग्रामसेवक ठरले असून त्यांच्या डोक्यात दोनदा हा मानाचा तुरा रोवल्या गेल्या.

विशेष बाब म्हणजे भाणारकर यांच्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारा करीता निवड झाली असून त्यांना तो पुरस्कार दि १२ मार्च ला मुंबई येथे पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.