Published On : Wed, Aug 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात तुकाराम मुंढेंचा दणका; ५६ हजार किलो सुपारी जप्त,दोन आस्थापनांचे परवाने निलंबित

Advertisement

नागपुरात तुकाराम मुंढेंचा दणका; ५६ हजार किलो सुपारी जप्त,दोन आस्थापनांचे परवाने निलंबित

नागपूर : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात मोठी कारवाई केली आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान तब्बल ५५ हजार ९९६ किलो भाजलेली सुपारी जप्त करण्यात आली असून, या साठ्याची किंमत तब्बल २ कोटी २३ लाख ९८ हजार ४०० रुपये असल्याची माहिती आहे.

या कारवाईदरम्यान प्रतापनगर येथील बुऱ्हामपूर जलेबी सेंटर आणि गिरीपेठ येथील स्टेप इन रेस्टॉरंट या दोन आस्थापनांमध्ये स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यव्यापी विशेष मोहिमेत आतापर्यंत ३७ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागपुरात मोठ्या प्रमाणात सुपारी जप्त करण्यात आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.