Published On : Wed, Aug 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप; गोंदियातून आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ही घरमालकाची मुलगी असून, तिच्यावर घरात भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी गोंदियातून अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर उर्फ भुवनेश्वर मोरदेवे (३५) असून तो मूळचा गोंदिया येथील रहिवासी आहे. तो एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत होता. मागील सुमारे सहा महिन्यांपासून तो तक्रारदाराच्या घरात भाड्याने राहत होता.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी चिमुकली घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला फूस लावून घरातील स्नानगृहात नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संध्याकाळी मुलीने पोटदुखीची तक्रार आईकडे केली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे समोर आले.

यानंतर कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण समोर येताच आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याचा शोध घेतला आणि गोंदियातून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से हमला! #NagpurNews #Crime #CrimeNews #news

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda #NagpurCrime

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges