आज युवासेना नागपूर जिल्हा तर्फे मा.हितेशजी यादव जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात मा. कुलगुरू श्री मुरलीधर चांदेकर यांना फीस वाढी न करत व शिक्षण शुल्क “installment” पद्धती ने घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ।। या वेळी मा. जिल्हा प्रमुख हितेश यादव यांनी सांगितले की , कोरोना मुळे समाजातील प्रत्येक घटकची आर्थिक बाजू विस्कळित झाली आहे.
तरी या शैक्षणिक वर्षात कोणतेही शुल्क वाढ करू नये असे झाल्यास युवासेना रस्तावर उतरेल असे म्हटले.
यावर कुलगुरू ने मागणी मान्य केली असून 2 जुलै च्या विद्यापिठ च्या बैठकीत यावर चर्चा करून असे कुलगुरू ने म्हटले आहे यावेळी याजिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे,शहर प्रमुख अक्षय मेश्राम, उपजिल्हा प्रमुख आकाश पांडे , उपजिल्हा प्रमुख (महाविद्यालय) ऋषीकेश जाधव ,शहर चिटणीस सलमान खान , शहर सचिव (दक्षिण) गौरव गुप्ता,अजय गुप्ता उपशहर प्रमुख रोहित तायवाडे, दक्षिण नागपूर उपाध्यक्ष आकाश रेवतकर,मुन्ना पांडे, निखिल शर्मा युवती पदाधिकारी प्रीतिताई काकडे ,जुली मसराम,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ।।