| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 22nd, 2020

  कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा;निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

  पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या वाॕर रुम ( डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतली व उपयुक्त सूचना केल्या.

  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ही प्रणाली विकसित केली आहे.याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण, शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र,वाढत असलेला परिसर याबाबतची अद्यावत माहिती याठिकाणी मिळते. त्यामुळे उपाययोजना करणे सोपे जाते.अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी मिळू शकते अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.

  अप्पर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याठिकाणी निरंतर काम चालू असते शिवाय बेडची उपलब्धता,भविष्यात लागणारे बेडस् ,डाॕक्टरांची संख्या या डॅश बोर्डवर पाहायला मिळते त्यामुळे तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाते असे सांगितले.

  यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,अपर आयुक्त शांतानु गोयल,आरोग्य प्रमुख डाॕ.रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.

  ही प्रणाली उत्तम आहे.एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तात्काळ रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे.भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य ठिकाणी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

  यावेळी त्यांनी पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली काय अशी विचारणा केली त्यावर आयुक्तांनी तसे झाले नाही.आपण त्यांच्या सतत संपर्कात असतो.रोज चार ते साडेचार हजार लोकांना फोन केला जातो असे सांगितले.

  क्टर,रुग्णवाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करा लगेच उपलब्ध करून देता येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145