Published On : Wed, Jul 3rd, 2019

निष्ठेने काम करणे हीच खरी सेवा:-डॉ संगीता टक्कामोरे यांचे प्रतिपादन

रामलाल बन्सोड यांचा महाविद्यालयातर्फ सेवानिवृत्ती निमित्त भावपुर्ण सत्कार

रामटेक: -श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथील कर्मचारी रामलाल बन्सोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ संगीता टक्कामोरे या होत्या.सत्कारमूर्ती रामलाल बन्सोड सौ.कचराबाई बन्सोड यांचा शाल,श्रीफळ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापकानीही त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.सत्कारमूर्ती रामलाल बन्सोड यांनी सत्काराला उत्तर देतांना रामलाल बन्सोड यांनी ,”महाविद्यालयाची सेवा करतांना माझ्या वाट्याला जेही काम आले ते मी वेळेवर आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला.

माझ्यावर प्राध्यापक, बाबू,विद्यार्थी व माझ्या सहकारी यांनी खूप प्रेम केले आणि मदतही केली. आणि निवृत्तीनंतरही मी कामातच वेळ घालविल” असे विचार व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणातुन मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ संगीता टक्कामोरे यांनी,”नोकरी करीत असताना सेवानिवृत्तीचा एक महत्त्वाचा टप्पा येत असतो.रामलालजी यांनी आपली सेवा खूप निष्ठेने व प्रामाणिकपणे केली.वाट्याला आलेले प्रत्येक काम आवडीने आणि प्रामाणिकपणे केले.

काम कोणतेही असो त्यात हयगय न करता ते वेळेवर आणि सर्वोत्तम रीतीने त्यांनी केले.महाविद्यालय आणि संस्था प्रगती करते त्यात कर्तव्यतत्पर कर्मचारी मोलाचे योगदान देतात.”,असे विचार व्यक्त करून त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ मनोज तेलरांधे,डॉ महेंद्र लोधी,नसीरुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा नितीन घमंडी,प्रा कल्पना पटेल,प्रा डॉ आर यु गायकवाड,प्रा अविनाश ठाकरे,प्रा गजानन रेवतकर, प्रा स्वप्नील मनघे,कु अर्चना पारवे,योगिता घोडमारे,ईलमकर,नागो नाटकर, अशोक कुचेकर,मनोहर बिसमोगरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा नरेश आंबिलकर यांनी केले.