मुंबई: मुंबई येथे 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताज हॉटेलमधील स्मृतीस्थळाजवळ पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
26/11 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताजमधील वास्तव्यास असलेले नागरिक, कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान मृत्युमुखी पडले होते.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हॉटेल ताजमधील छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर मृतांची नावे कोरण्यात आली आहेत. आज इस्त्रायलचे पंतप्रधान श्री. नेत्यानाहू व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दोघांनी पुष्पचक्र अर्पण करुन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांना स्मृतिस्थळाविषयी माहिती देण्यात आली. तसेच श्री.नेत्यानाहू यांनी संदेश वहीत आपला संदेशदेखील नोंदविला.
Advertisement

Advertisement
Advertisement