Published On : Thu, Jan 18th, 2018

जैविक विविधतेच्या व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र समन्वयक नेमावा : दिव्या धुरडे

Advertisement

नागपूर: : महराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे कामकाज बघण्याकरिता मनपा व समिती यामधील दुवा म्हणून स्वतंत्र समन्वयक नेमण्यात यावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी केले.

गुरूवार (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत समिती सदस्य सोनाली कडू, सदस्य निशांत गांधी, मनपाचे उद्यान अधीक्षक धनंजय मेंडुलकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, जैविक विविधता विभागाच्या विभागीय वन अधिकारी प्रीती तलमले, महाराष्ट्र मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रकाश लोणारे, राजू चरडे, व्ही.एम.इलोरकर, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत जैविक विविधता व्यवस्थापन समिती नेमणे बंधनकारक केले. जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या लोक जैविक विविधता नोंदवही व दैनंदिन कामे बघण्याकरिता वनस्पती शास्त्रज्ञ नेमण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या समितीच्या कामाकाजाकरिता वनस्पती शास्त्रज्ञ नेमणे बंधनकारक आहे. याशिवाय महानगरपालिका व व्यवस्थापन समितीमध्ये समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र समन्वयक नेमणे गरजेचे आहे. तो लवकरात लवकर नेमावा, असे निर्देश समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे यांनी दिले.

जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे स्वतंत्र बँक खाते तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश दिव्या धुरडे यांनी दिले.

प्रारंभी समितीच्या सदस्यांचे स्वागत उद्यान अधीक्षक धनंजय मेंडुलकर आणि उद्यान निरिक्षक अऩंत नागमोते यांनी केले. विभागीय वन अधिकारी तलमले यांनी शासनाच्या योजनांचे सादरीकरण केले.

Advertisement
Advertisement