Published On : Thu, Nov 28th, 2019

सावित्री फुले महिला संस्थे व्दारे संविधानदिन व शहिदांना श्रध्दाजंली

कन्हान : – सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान व्दारे डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक, संस्था कार्यालय येथे संविधान दिन साजरा करून तारसा रोड येथील शहिद स्मारकावर पुष्प वाहुन २६/११ च्या शहिदांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

मंगळवार दि २६ नोव्हेंबर ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व संविधान प्रास्तविकाचे वाचन करण्यात आले. सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान कार्यल यात संविधान दिन साजरा करून तारसा रोड शहिद चौकात शहिद स्मारकावर पुष्प वाहुन दोन मिनीट मौन धारण करून २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिद वीरांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रतिभाताई चवरे यानी तर मार्गदर्शन दुर्गाताई निकोसे हयानी केले.

याप्रसंगी वच्छलाबाई कळमकर, प्रमिलाताई घोडेस्वार, दुर्गाताई गजभिये, उषाताई सागोंडे, मायाताई बेलेकर, शारदाबाई वारके, ज्योतीताई मोटघरे, वराडे ताई, संध्याताई साखरे, विजयाताई निकोसे, अनिता चहांदे, मायाताई वाघमारे, मायाताई चिमणकर, नयना धनविजय, रंजनीताई कुंभारे सह महिला सदस्या उपस्थित होत्या.