नागपूर : शहरातील धरमपेठ परिसरातील महेश चौक येथे होर्डिंग लावण्यासाठी झाडांच्या फांद्या तसेच काही वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माहितीनुसार, महेश चौक परिसरात जाहिरातीचे मोठे होर्डिंग उभारण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या. काही झाडांचे नुकसान झाल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत हरित नागपूरच्या घोषणांवरच टीका केली.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, एका बाजूला शहरात वृक्षसंवर्धन आणि हरितीकरणाचे अभियान राबवले जाते, तर दुसऱ्या बाजूला व्यावसायिक फायद्यासाठी खुलेआम झाडांची कत्तल होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, नगरसेवक सुनील हिरणवार यांनीही या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. “शहरातील झाडांची अशा पद्धतीने कटाई सहन केली जाणार नाही. दोषींवर तातडीने कारवाई व्हावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




