Published On : Mon, Feb 8th, 2021

कोषागार दिन उत्साहात साजरा

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी लेखा व कोषागार संचालनालयांतर्गत कोषागार दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. दरवर्षी 1 फेब्रुवारीला लेखा व कोषागार दिन साजरा करण्यात येतो.

कोराना महामारीमुळे उद् भवलेल्या समस्या लक्षात घेता नियमांचे काटेकारे पालन करुन कोषागार कार्यालयाच्या प्रांगणात सहसंचालक स्थानिक निधी व लेखा, सहसंचालक लेखा व कोषागारे तसेच वरिष्ठ कोषागार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून कोषागार दिन साधेपणाने साजरा केला.

सुशोभित करण्यात आलेल्या कार्यालयात सहसंचालक श्रीमती पांडे, श्रीमती मोना ठाकूर, प्रभारी अप्पर कोषागार अधिकारी अरविंद गोडे, प्रशांत गोसेवाडे, सतीश गोसावी तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी असे जवळपास दोनशे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून यावेळी सत्कार करण्यात आला.


कोरोना काळातील अतिशय कठीण परिस्थितीत वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोषागारातील कामकाज उत्तमरीत्या पार पाडल्यामुळे कोषागार अधिकाऱ्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना छोटीशी भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार व संचालन नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी केले.