नागपूरसह नागभिड, गोंदिया आणि छिंदवाड्यात छापेमार कारवाई
नागपूर: आरपीएफच्या पथकाने नागपूरसह नागभिड, गोंदिया आणि छिंदवाड्यात छापेमार कारवाई करुन रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया रॅकेटचा भंडाफोड केला. छापेमार कारवाईत आरोपीसह रोख रक्कम आणि रेल्वे तिकीट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
उन्हाळ्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रतीक्षा यादीही वाढत जाते. पण सर्वांनाच कन्फर्म बर्थ हवी असते. प्रवाशांची ही अडचन लक्षात घेता रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय होतात. काही दलाल जास्तीचे कमिशन घेऊन प्रवाशांना तिकीट बनवून देतात. यासर्वांच्या हालचालींवर आरपीएफचे पथक नजर ठेवून होते. पथकाने नागपुरसह सर्वच ठिकाणी काळाबाजार उघड करण्याची मोहिम चालविली. याअंतर्गत संबंधित तिकिटांच्या दलालांवर छापामार कारवाई करण्यात आल्याचे पांडे यांनी यावेळी सांगितले़
या छापामार कारवाईत धंतोली येथील प्रभात टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सकडून अवैधरित्या तिकिटे बनवून दिली जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच, तेथे धाड मारण्यात आली. या कारवाईत २१ हजार ९०० रुपयांची लाईव्ह तिकिटे आढळून आली़ यासोबतच, रद्द काऊंटर तिकिटेही सापडली़ या सर्व तिकिटांची किंमत ३१ हजार ७०० रुपये इतकी आहे़ रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून प्रभात टूर्समधून एकूण ५७ हजार ६१५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले़ त्याच्यावर १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ यासोबतच, गोंदिया येथे झालेल्या कारवाईत ७०५ लाईव्ह तिकिटे जप्त करण्यात आली़ येथून तिकिटे व साहित्य मिळून एकूण ५९ हजार रुपयाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ नैनपूरमध्ये झालेल्या कारवाईत ४६ हजार रुपयांची लाईव्ह तिकिटे पकडण्यात आली़ छिंदवाडा मध्ये झालेल्या कारवाईत तिकिटे व साहित्य मिळून एकूण ६१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला़ तर, नागभिड मध्ये झालेल्या कारवाईत तिकिटे व साहित्य मिळून एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पांडे यांनी यावेळी सांगितले़ यावेळी, असिस्टंट कमांडेंड एक़े़ स्वामी, उपनिरिक्षक मो़ मुगीसुद्दीन उपस्थित होते़
कारवाईचा सुरूच राहणार – पांडे
रेल्वे तिकीटांचा काळाबाजारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत धाडसत्र सुरू राहील. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाईत लाखो रुपयांची तिकीट जप्त करण्यात आले आहेत. पुढेही कारवाईचा सपाटा सुरूच राहणार असल्याचे आशुतोष पांडे यांनी यावेळी सांगितले़
