| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, May 16th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  रेल्वे कर्मचायाचा मोबाईल हिसकावून पसार

  रेल्वे स्थानकाच्या आऊटरवरील घटना

  नागपूर: रेल्वे स्थानक आणि फलाटावर प्रवाशांच्या गर्दीत पाकिट आणि मोबाईल चोरांचा सुळसुळाट असतो. गर्दीतच चोरांना चांगली संधी मिळते. अशा चोºया आता नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, प्रवासादरम्यान एखादा प्रवासी मोबाईलवर बोलत असेल आणि रूळाशेजारी असलेल्या चोरटा गाडीत चढून त्यांचा मोबाईल हिसकावत असेल तर… हो चोरांची एवढी हिंमत वाढली आहे. चक्क धावत्या रेल्वेत चढून प्रवाशाचा मोबाईल हिसकावतात. गुन्हेगारांची दादागिरी आता चांगलीच वाढली आहे. असाच काहीसा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकाच्या आऊटवर उघडकीस आला.

  सेवाग्राम, वर्धा निवासी रोशनकुमार रंजनकुमार (२६) हे मध्य रेल्वे नागपूर विभागात ट्रॅक मेंटनर म्हणून कार्यरत आहेत. इंजिनिअरींग विभागाअंतर्गत सेवाग्राम येथे त्यांची ड्यूटी आहे. शनिवार ११ मे रोजी रात्री अजमेर – पूरी एक्स्प्रेसने वर्धा ते रायपूर असा प्रवास करीत होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून गाडी सुटल्यानंतर आऊटरपर्यंत गेली असता रेल्वे रुळाशेजारी असलेला चोरटा धावत्या रेल्वेत चढला. काही कळण्याआधीच त्याने रोशनकुमारच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि उडी घेऊन पसार झाला. रोशनने आरडा ओरड केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण त्यानंतर गाडीची गती पुन्हा वाढली होती. त्यामुळे रोशन गाडीतून उडी घेऊन त्याचा पाठलाग करू शकत नव्हता.

  यापूर्वी मुंबई आणि कोलकाता आऊटरवर मोबाईल हिसकावणाºया टोळ्या असायच्या. रेल्वे स्थानक जवळ आला की गाडीची स्पीड कमी होते. तसेच स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतरही गती कमीच असते. बहुतेक प्रवासी खिडकी जवळ किंवा दाराजवळ येऊन मोबाईलवर बोलत असतात. या संधीचा फायदा घेत भुरटे चोर प्रवाशांचा मोबाईल हिसकावून पसार व्हायचे. अशा अनेक घटना घडल्यानंतर पोलिसांनी टोळीची बंदोबस्त केला होता. आता पुन्हा अशाच प्रकारची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी रोशनकुमारने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145