Published On : Wed, May 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मध्यरात्री तृतीयपंथीयांचा विहिप कार्यालयासमोर ठिय्य;हत्येच्या आरोपीच्या ‘पीठाभिषेकाला’ विरोध !

३००हून अधिक तृतीयपंथीयांचा आत्मदहनाचा इशारा
Advertisement

नागपूर : शहरातील पारडी परिसर मंगळवारी रात्री अचानक पेटला, जेव्हा सुमारे ३०० ते ४०० तृतीयपंथीयांनी विश्व हिंदू परिषद (विहिप) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत हत्या आरोपी उत्तम बाबा यांच्या प्रस्तावित पीठाभिषेकाला जोरदार विरोध केला. रात्री ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तृतीयपंथीय समाजाच्या म्हणण्यानुसार, २०१९ मधील चर्चित चमचम गजभिये हत्याकांडातील आरोपी उत्तम बाबा नुकताच सात वर्षांनंतर जामिनावर बाहेर आला आहे. विशेष म्हणजे, ६ मे रोजी किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्या हस्ते त्याचा पीठाभिषेक करण्याचा कार्यक्रम आखण्यात आल्याने संताप उसळला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हत्या आरोपीला धार्मिक सन्मान? समाज सहन करणार नाही-
आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, त्याचा सन्मान म्हणजे आमच्या समाजाचा अपमान.” कार्यक्रम रद्द न झाल्यास आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचीही चेतावणी देण्यात आली.

पैशांच्या वादातून झाला होता खून-
माहितीनुसार, २०१९ मध्ये चमचम गजभिये यांची हत्या पैशांच्या वाटपाच्या वादातून झाली होती. या प्रकरणानंतर तृतीयपंथी समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आरोपीच्या अटकेसाठी दबाव निर्माण केला होता.

Advertisement

जामिनावर बाहेर येताच पुन्हा दबाव आणि धमक्या-
तृतीयपंथीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, जामिनावर सुटल्यानंतर उत्तम बाबा पुन्हा समाजातील सदस्यांना धमकावत असून, पैशांची उकळपट्टीही करत आहे. अशा पार्श्वभूमीवर त्याचा पीठाभिषेक हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले.

विहिपला निवेदन; निर्णयाची प्रतीक्षा-
आंदोलनादरम्यान तृतीयपंथीयांनी विहिप पदाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यावर दोन्ही बाजूंची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन विहिपकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता आणि परिसरात तणावपूर्ण शांतता कायम होती.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges