Published On : Sat, Jun 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हिंगण्यात ट्रान्सफॉर्मर बदलताना वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा

Advertisement

नागपूर : हिंगणा तालुक्यात ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू असताना महावितरणच्या एका वायरमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्तव्य बजावत असतानाच हा अपघात झाल्याने वीज विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत कर्मचाऱ्याची ओळख अजय अरविंद हाडगे (वय 31) अशी असून ते महावितरणच्या हिंगणा आर-2 बीसी पंचवटी विभागात वायरमन म्हणून कार्यरत होते. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओखळी आश्रय शाळेमागील शेत परिसरातील विद्युत खांबाजवळ ही घटना घडली.

Gold Rate
June 06 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,46,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, 4 जून रोजी सकाळच्या सुमारास अजय हाडगे हे सहकाऱ्यांसोबत ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम करत होते. यावेळी अचानक त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का बसताच ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना हिंगणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी अक्षय विजय झंझाड यांच्या फिर्यादीवरून हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते आणि कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले होते का, याचीही चौकशी केली जात आहे.

ड्युटीदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून अजय हाडगे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगणा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges