Advertisement
औरंगाबाद ( Maharashtra Today News ) : एवीपी माझा मध्ये आज स्पष्टीकरण केले आहे की बदलीसाठी राजकीय शिफारस करणं पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. शिफारसी आणणाऱ्या 42 पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत गृह विभागाने दिले आहेत.
राज्यातील पोलिस निरीक्षकांनी अनेक आमदार, मंत्री तसंच इतर राजकीय नेत्यांचं शिफारसपत्र बदलीसाठी जोडलं होतं. या संदर्भातील लेखी खुलासा आता घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
राजकीय व्यक्तीकडून शिफारस आणणाऱ्या 42 पोलिस अधिकाऱ्यांची नावं गृह विभागाने दिली आहेत आणि त्यांच्याकडून लेखी खुलासा घेतला जाणार आहे.
पोलिसांना बदलीचं शिफारसपत्र देणाऱ्यांमध्ये मंत्री विनोद तावडे, गिरीष बापट, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांची नावं आहेत.